आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन समाजात वाद:कारला देवचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न

पुसद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद तालुक्यातील कारला देव येथे लग्नाचा डीजे वाजवण्यावरुन दोन समाजात वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी सामाजिक ऐक्य परिषद घेण्यात आली. परिषदेला गावातील देविदास देवकते, बंडू राठोड, सुभाष राठोड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शामराव पवार, फकिरा ढोले, शेषराव राठोड, हरिभाऊ चव्हाण आदींनी कारला देव येथे गेल्या शंभर वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

या परिषदेला गावकरी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. २ ऑक्टोबरला पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख मुद्द्यावर चर्चा झाली. चर्चामध्ये गावातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोबतच गुन्ह्यातील फरार आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन देखील देण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे. गुन्ह्यातील एकही आरोपी सुटणार नाही अशी ग्वाही गावकऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी दिली असल्याचे सांगितले आहे. कारला देव येथील एकाच घटनेत दोन गुन्हे त्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार आणखीन चार जणांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या जीवनातील ही पहिलीच दुर्दैवी घटना समोर आल्याचे मत देखील पत्रकारांसमोर व्यक्त केले

गावाला छावणीचे स्वरूप
गाव परिसरात यवतमाळ येथील पोलिस कर्मचारी तैनात केले असून दिवस रात्र पेट्रोलिंग व गल्लो गल्ली पायदळ फिरणारे पोलिस कर्मचारी तैनात केल्याचे माहिती पत्रकारांना दिली आहे. गावात वातावरण खराब होऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. गावाला छावणीचे रूप आले असुन कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...