आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:एक तासाच्या पावसाने नालीतील घाण रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्यात्या प्रश्न चवाट्यावर

पुसद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बहुतांश भागात एक तास पाऊस पडला. अशातच नगरपालिका हद्दीतील रहेमत नगर परिसरातील हजरत उमर फारूक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दि. १४ जूनला दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाऊस पडला. पाऊस पडल्याने नालीतील घाण कचरा रस्त्यावर आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली होती.

पुसद शहरात एक दिवसाच्या विश्रांती घेतल्यानंतर दि. १४ जुन रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली. एक तास जोरदार पडलेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या. सोबतचा शहरालगतच्या श्रीरामपूर, कवडीपूर, काकडदाती, गोविंद नगर, विठाळा वार्ड, गायमुख नगर, निंबी पार्डी, हर्षीसह आदी भागात जोरदार पाऊस पडला आहे. पुसद शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अधून मधून पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरीवर्ग मशागतीच्या कामाला लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...