आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळी, राखी प्रशिक्षण कार्यशाळा:भाजप महिला सक्षमीकरण केंद्राचा पुढाकार

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आमदार मदन येरावार तसेच जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात भाजप महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने रांगोळी राखी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत महिलांचा आवडता छंद कलाकृती रेखाटने म्हणजे रांगोळी होय. आता सणासुदीचे दिवस अशावेळी रांगोळीचे फार महत्त्व म्हणूनच महिलांची आवड तसेच कल्पकता बघून रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा भाजप महिला सक्षमीकरण केंद्राच्या वतीने घेण्यात आली. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या रांगोळी जसे संस्कार भारती, पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, धान्याची रांगोळी, भुश्याची रांगोळी, पानाफुलांची रांगोळी, अशा विविध प्रकारचे रांगोळीचे प्रकार शिकवण्यात आले. त्याच प्रमाणे महिला सक्षमीकरण केंद्राचा उद्देश हाच की महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताशी काम देणे आणि त्यांना आर्थिक सक्षम बनविणे या हेतूनेच राखी राखी प्रशिक्षण कार्यशाळा सुद्धा घेण्यात आली. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या राख्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून वैशाली शेटे या लाभल्या. वैशाली शेटे यांची सुद्धा तळमळ महिलांना आर्थिक सक्षम बनविणे हेच आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच त्याही महिलांना प्रशिक्षण देत आहे. यावेळी सर्व महिला सक्षमीकरण केंद्रातील महिलांचा यामध्ये सहभाग होता. विशेष सहकार्य सुषमा येरावार, स्वाती मिर्झापुरे, उज्वला पूर्के, प्राजक्ता शिंदे बरखा पाली, गीता मोरे, सुजाता काळबांधे, प्रतिभा पचगाडे, मीना फुलकर, सविता जोमदे, कविता जोमदे, कविता सुरावार, कविता देशमुख मयुरी फुलकर यांचे लाभले.

महिलांनी सुद्धा अतिशय उत्साहाने वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात बनविलेल्या राख्यांना आता विक्रीस ठेवण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक हातभार लागेल आणि हळुहळू ही महिला उद्योजकांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकेल जेणेकरून महिला सक्षमीकरण केंद्राचा हेतू साध्य होईल,असे शैला मिर्झापुरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...