आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संकल्प फाउंडेशनचा पुढाकार;  राळेगाव तालुक्यात मदत

राळेगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन आठवड्यापूर्वी राळेगाव तालुक्यातील अनेक गावांत पूर परिस्थिती उद्भवली होती. अनेक घरे आजही प्रभावित आहेत. आज सकाळी संकल्प फाउंडेशनच्या वतीने व यवतमाळ कर जनतेच्या सहभागाने राळेगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन जीवनावश्यक वस्तूंची किट प्रत्येक कुटुंबाला देण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे यांच्यासह सर्व संस्था संघटनांचे समन्वयक घन:श्याम दरणे, सुरेश राठी ह्यांच्या उपस्थितीत संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, संकल्प आपुलकीच्या २० जणांची चमू राळेगावसाठी रवाना झाली. राळेगावचे तहसीलदार रवींद्र कानडजे, नायब तहसीलदार बदकी, मंडळ अधिकारी निनावे, तलाठी महिंन्द्रेकर, कृषी सहाय्यक, स्थानिक गावातील सरपंच ह्या प्रशासनिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांच्या सोबत तालुक्यातील सावंगी (पे) येथील ६८ पूरग्रस्तांना, एकबुर्जी येथील ३१, कोपरी येथील १९, रोहिणी येथील २६ पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक किराणा किटचे वितरण ह्यावेळी करण्यात आले. ह्या मोहिमेसाठी संकल्प फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके, संयोजक गजेंद्र उन्हाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, रवी ठाकूर, आशिष महल्ले, मनोज तामगाडगे, राजेंद्र गावंडे, वीरेंद्र कलोसिया, अशोक पलंगे, रवी कडू, शहराध्यक्ष विनोद दोंदल, आकाश भारती, शुभम वानखडे, अक्षय हांडे, अनिकेत गोपाळे, संकल्प वनिता वाहिनीच्या महिला प्रमुख, अंजली फेंडर, संगीता टिप्रमवार, वर्षा गावंडे, पूनम शेंडे, स्नेहल रेचे ह्यांनी योगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...