आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम भावी छात्र शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करुन हा दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीकांत परबत तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शीतल माकोडे, प्रा. नीता देवतळे, प्रा. कैलास बोके उपस्थित होते.सर्वच भावी शिक्षिकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे शीतल माकोडे यांनी महिला सक्षमीकरण आणि विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण केल्याशिवाय उन्नती होणार नाही असे मत मांडले तर, प्रा. नीता परबत यांनी हजारो पिढ्यांना घडवणाऱ्या भावी शिक्षिका भगिनींनी भविष्यात पुढाकार घेऊन मुलींच्या व्यवसाय व शिक्षणासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
हा कार्यक्रम पुरूष छात्र शिक्षकांनी आयोजित केला होता. अध्यक्षीय भाषणातून डॉ. श्रीकांत परबत यांनी देशाच्या विकासासाठी महिलांचे मोठे योगदान असून संवेदनशीलता आणि चिकाटी हे दोन गुणांमुळे महिलांची विषेश ओळख असल्याचे उत्तम उदाहरण त्यांनी दिले. यावेळी छात्र शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. सुशील सुरपाम, अथर्व ओंकार, तन्मय परेकर, शंकर पवार, तुषार यांनी प्रयत्न केले. संचालन अथर्व ओंकार तर आभार तन्मय परेकर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.