आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचा पुढाकार:शहरातील स्वातंत्र्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पालिकेचा पुढाकार

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपुर्ण देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने यवतमाळ शहरात असलेल्या विविध ऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा आणि त्यांचे जतन करुन येणाऱ्या पिढीसाठी हा ठेवा सुरक्षीत ठेवावा यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यात सुमारे १ कोटी २९ लाख रुपयांचा निधी खर्च करुन ३ ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यात येत आहे. या तिन्ही कामाची सुरूवात े करण्यात आली.

शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या या स्थळांच्या विकास करण्यासाठी पालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यात ज्या मंचावरून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विनोबा भावे या विभुतींनी जमिनीचे दान स्वीकारुन या जिल्ह्याच्या दातृत्व भावनेचे कौतुक केले. त्या मंचाचे सुशोभीकरणासह येथे विलोभनीय बाग, परिसराला सुरक्षाभिंत, भिंतीवरील कोरीव शिल्प-म्युननरल, फाउंटन, विद्युत व्यवस्था, करण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरणारे असे हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जात आहे.

त्याचप्रमाणे रेडक्रॉस भवनाशेजारी जागेवर “मातृपीठ” हे स्मारक स्थळ साकार होत आहे. स्वातंत्र्य पुर्व काळातील नगर पालिकेच्या कर्मचारी रंगुबाई मिडवाईफ येथे वास्तव्य करीत होत्या. सरकारी नोकरी करत ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध लढा व स्वातंत्र्य सैनिकांच्या निरोपाची महत्त्वपूर्ण जवाबदारी त्यांनी पार पाडली. माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनात नगर अभियंता विनय देशमुख,गजानन वातिले, प्रियंका फुकटे यांच्या देखरेखीखाली लवकरच ही सर्व कामे पुर्ण केल्या जातील. कार्यक्रम यशस्वितेसाठी अधीक्षक ममता राठोड, डॉ. विजय अग्रवाल, प्रविण उंदरे, प्र. अधि. निता गावंडे, संजय चुनारकर, फेंडर, विलास काळे, यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन सुनिल काळे व सुनिल वासनिक यांनी केले.

संघटनांच्या म्होरक्यांच्या भेटण्याची पसंतीची जागा
हनुमान आखाडा चौक म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील हालचालींचे नियोजन करणाऱ्या युध्द मंडळ, स्वास्तिक मंडळ व आनंद मंडळ या विविध संघटनांच्या म्होरक्यांच्या भेटण्याची पसंतीची जागा. रात्रीचा अंधार असो की पोलिसांचा जागता पहारा असो. ३४ कलमातील आंदोलनाची दिशा ठरवणारे ठीकाण म्हणजे हा चौक. म्हणुनच जागृतीचे व प्रकाशाचे प्रतिक घेऊन असणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिकात्मक पुतळा व विहिरीवर फाउंटन असे स्मृतिशिल्प हनुमान आखाडा चौक येथे उभारण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...