आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थी परिवर्तन आघाडी व ईश्वर फाउंडेशनचा पुढाकार; दिग्रस येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

दिग्रस9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका व शहरातील इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ईश्वर फाउंडेशन, परिवर्तन विकास विद्यार्थी आघाडी व संजय देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने श्री राजेश्वर मंगल कार्यालयात विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी करिअर मार्गदर्शन शिबिर देखील पार पडले.

अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र अरगडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राजेश्वर जोध, प्रा. अजय देशपांडे, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहराध्यक्ष संदीप झाडे, मकसूद, विक्रम अटल, एजाज, दीपक वानखडे, शे. रोशन, सखाराम तुंडलवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. तद्नंतर मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रमोद सूर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विविध शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी, असे मत व्यक्त केले. दिग्रस शहराची व परिसराची शैक्षणिक तसेच सांस्कृतिक परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे आणि त्याच परंपरेला अधिक उज्वल आणि वृद्धिंगत करण्यासाठी ईश्वर फाऊंडेशन, परिवर्तन विकास विद्यार्थी आघाडी, तथा संजय देशमुख मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रावीण्य यादीत उत्तीर्ण विद्यार्थांचा प्रमाणपत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रा. राजेश्वर जोध आणि प्रा.अजय देशपांडे यांनी सखोल माहिती दिली. याप्रसंगी परिवर्तन विकास विद्यार्थी आघाडीच्या नियुक्त्या करून नियुक्तिपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साद देशमुख, संचालन पुरुषोत्तम बोबडे व आभार भोकरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...