आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:यवतमाळ आयडॉल होण्याची‎ जिल्ह्यातील कलावंतांना संधी‎

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समता पर्व अंतर्गत यवतमाळ आयडॉल‎ ही गीत गायन स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी‎ नोंदणी १ ते १८ मार्चपर्यंत दुपारी ४ ते ६.३० या वेळात‎ येथील संविधान चौकातील लॉर्ड बुद्ध विहार येथे केली‎ जाणार आहे. यासाठी वयोमर्यादा १० ते ३५ वर्षे आहे.‎ स्पर्धकांचे ऑडिशन १९ मार्च रोजी येथील निवृत्त‎ अभियंता भवनात सकाळी १० वाजतापासून सुरू‎ होईल. यातून १६ स्पर्धक प्रथम फेरीस पात्र ठरतील. या‎ स्पर्धेच्या तीन फेऱ्या होऊन यातून यवतमाळ आयडॉल‎ निवडले जाईल. स्पर्धेसाठी समता पर्वचे अध्यक्ष‎ मनोहर शहारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यवतमाळ‎ आयडॉलसाठी नोंदणी करावी, अशी विनंती या‎ स्पर्धेचे मुख्य संयोजक दीपक नगराळे, राखी भगत‎ आदींनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...