आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

यवतमाळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, दि. २० जून रोजी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. शेकडोंच्या संख्येत उपस्थित झालेल्या महिलांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अमरावती ते यवतमाळ पदयात्रा सोमवार, दि. २० जून रोजी पासून काढण्यात येणार होती. तत्पूर्वी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण अधिकारी यशोमती ठाकूर, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या मागण्यांचा सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल, असे आश्वासन मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. सध्या अंगणवाडी सेविकांना ८ हजार ३०० रूपये दरमहा, तर मिनी सेविकांना ५ हजार ९०० रूपये, मदतनिसांना ४ हजार ४५० रूपये मानधन दिल्या जाते.

यात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती.. दरम्यान, सोमवार, दि. २० जून रोजी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेश सिंग, सतीश चौधरी, विजया सांगळे, ज्योती कुळकर्णी, अरूणा अलोणे, हुकुम ठमके, शिला काळे, माया पवार, ज्योती शेरेकार, लता माटे, मीनापवार, निर्मला राठोड, कविता कदम, वनमाला बनकर, गंगा वाघमारे, सुनीता गावंडे, प्रज्ञा जोशी, नंदा पोयाम, अनिता जगताप यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...