आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात‎ जनावरांची सुटका:जनावरांची तस्करी, तीन जणांना अटक‎

कळंब‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्दयीपणे जनावरांना कोंबून नेणारी‎ बोलेरो कळंब पोलिसांनी पकडून सात‎ जनावरांची सुटका केली. ही कारवाई‎ मजरा फाट्यावर रविवारी सायंकाळच्या‎ सुमारास करण्यात आली असून तिघांना‎ अटक करण्यात आली. राजू राठोड वय‎ ४० वर्ष, धनंजय जिभकाटे वय ४५ वर्ष‎ आणि प्रविण जिभकाटे वय ३४ वर्ष सर्व‎ रा. कारेगांव (यावली) अशी ताब्यात‎ घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.‎ सध्या चोरीची जनावरे, तर काही‎ कत्तलसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाहतूक वाढली आहे. पांढरकवडामार्गे‎ आदिलाबादकडे जाणाऱ्या जनावरांच्या‎ गाड्या पकडल्या जात आहे.

अशाच‎ प्रकारे कळंब, राळेगाव, डोंगरखर्डामार्गे‎ मजरा फाट्यावरून रविवारी सायंकाळी‎ कळंब पोलिसांना बोलेरो मालवाहू‎ वाहन संशयास्पद स्थितीत आढळून‎ आले. यावेळी ती बोलेरो पोलिसांना‎ थांबवून तपासणी केली असता,‎ त्यामध्ये बैल, गोऱ्हे असे ७ जनावरे‎ आढळून आली. या प्रकरणी पोलिस‎ कर्मचारी संजय रामगडे यांनी दिलेल्या‎ तक्रारीवरून पोलिसांनी विविध‎ कलमान्वये गुन्हे नोंदवून त्या तिघांना‎ अटक केली. तर जनावरे गोरक्षणच्या‎ ताब्यात देण्यात आली. या प्रकरणाचा‎ पुढील तपास कळंब पोलिस करीत‎ आहे.‎