आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:मंगरूळ येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुदेव सेवा मंडळ मंगरुळ तरोडा व अण्णाभाऊ साठे समाज मंडळ तसेच समस्त मंगरूळ ग्रामवासीयातर्फे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०२ जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम सामुदायिक प्रार्थना अष्टक व संपूर्ण प्रार्थनेचा परिपाठ घेण्यात आला. मंगरूळ गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य बबन चव्हाण यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, उस्ताद लहुजी साळवे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व ग्रंथसंपदा अद्यापही सामान्य जणांपर्यंत पोहोचली नाही. ग्रामीण भागात आजही काही विचारवंतांच्या व लोकांच्या बाबतीत वावडे आहे.

कोण अण्णाभाऊ ? त्यांच्या साहित्याचं आमच्याशी काय नातं ? असे विविधांगी प्रश्न उभे करून तो कितीही महान व्यक्ती असला तरी त्याला जात- धर्माच्या जोखडात बंदिस्त करून कमी लेखण्याचा प्रयत्न होतो. हेच अण्णाभाऊ उच्चवर्णीय समाजात जन्माला आले असते तर त्यांचं साहित्य घरोघरी पोहोचवलं असतं. जशा आध्यात्मिक काल्पनिक आख्यायिका पोहोचवणारे कर्मठ आहे तसे पण अण्णा भाऊंचे एकूणच सामाजिक वलय व त्या परिस्थितीतून मार्ग काढत जी साहित्य संपदा निर्माण केली त्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास साष्टांग दंडवत घातलेच पाहिजे असे डॉ. अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रसंगानुरूप प्रतिपादन केले. संजय कांबळे, यांनीही अण्णाभाऊंच्या लेखणीची प्रशंसा केली. ताराचंद चव्हाण, भगवान घुटके, राहूल मानकर, विठ्ठल कोडापे, सुधाकर धोंगडे, नारायण सूर्यकार, किशोर लंबे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...