आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरुवात:पोलिस दलाची वार्षिक तपासणीला सुरुवात

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या वार्षीक तपासणी सुरूवात केली आहे. तीन दिवसापूर्वी डॉ. बन्सोड यांचे पथक शहरातील अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या पथकाने पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड तपासणीला सुरूवात केली आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांची वार्षीक तपासणी करण्यात येते. त्यानूसार यासाठी काही दिवसापूर्वीच जिल्ह्यातील पोलिस ठाण्याला सूचना प्राप्त झाली आहे. त्यानूसार पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली होती. पोलिस ठाण्याच्या इमारतीची रंगरंगोटी, प्रत्येक ठाण्याच्या परिसराची स्वच्छता करण्यासह इलेक्ट्रीक वायर दुरुस्ती आणि इतर किरकोळ स्वरूपाची कामे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आवश्यक तेथे सूचना फलक लावण्यात आले होते. तीन दिवसापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांचे पथक शहरातील अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाले. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील रेकॉर्ड तपासणीला सुरूवात केली आहे. यात पोलिस ठाण्याच्या हद्दीत किती गुन्हे घडले, त्यातील किती गुन्ह्यांचा तपास लागला, किती आरोपींना अटक करण्यात आली. किती जणांना शिक्षा झाली. किती गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. आदींची माहिती तपासण्यात येत आहे. त्यानंतर बुधवार, दि. २१ डिसेंबरला स्वत:ला पोलिस अधीक्षक डॉ. बन्सोड पोलिस ठाण्याला भेट देवून आढावा घेणार आहे.

रेकॉर्ड अपडेटचा प्रयत्न
वार्षीक तपासणीत संबंधीत पोलिस ठाण्याच्या हद्दीत किती गुन्हे घडले, त्यातील किती गुन्ह्यांचा तपास लागला, किती आरोपींना अटक करण्यात आली. किती जणांना शिक्षा झाली. किती गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. आदींची माहिती पोलिस अधीक्षकांकडून तपासण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिस ठाण्यांचे रेकॉर्ड अपडेट करण्यात आले आहे. तसेच एसपी डॉ. पवन बन्सोड यांनी ऐनवेळी एखादी माहिती मागितल्यास ती तत्काळ उपलब्ध व्हावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...