आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खारीज:बदली पात्र यादीतील 86 शिक्षकांचे अपील खारीज

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यांतर्गत बदलीच्या पार्श्वभूमीवर बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी शिक्षकांना मुदत दिली होती. त्या दृष्टीने ८६ शिक्षकांनी आक्षेप नोंदवले होते.

या शिक्षकांचे आक्षेप प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी खारीज केले. आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी निश्चित केलेला आहे. तर अंतीम यादी सोमवार, दि. १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर होवू घातलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली होती. त्यात बदली पात्र एक हजार ८१० आणि अधिकार पात्र २१० शिक्षकांचा समावेश होता. प्रसिद्ध झालेल्या याद्या तात्पुरत्या स्वरूपात होत्या. यावर शिक्षकांना आक्षेप नोंदवण्यासाठी अवधी देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...