आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनरव्हिल क्लबचा पदग्रहण सोहळा:क्लबच्या अध्यक्षपदी प्रतिभा मुळे पवार यांची नियुक्ती

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्सचा पदग्रहण सोहळा, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला व दारूबंदी व्यसनमुक्तीवर कार्यक्रम रविवारी रोटरी हॉलमध्ये पार पडला. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय म्हसाळकर, घनश्याम बागडी, माजी अध्यक्ष माणिक मेहरे, जिजाऊ फाउंडेशन अध्यक्षा विद्या खडसे उपस्थित होते.

दीप प्रज्वलन करून आणि इनरव्हील प्रार्थना म्हणून मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या सोहळ्यात क्लबच्या अध्यक्षपदी प्रतिभा मुळे पवार यांची नियुक्ती करण्यात आली. माजी अध्यक्ष रीतू गायकवाड यांनी त्यांना पदभार सोपवला. उपाध्यक्षपदी संगीता पुरी, सचिव अबोली डिक्कर, आयएसओ प्रणिती येरपुडे, अनिता वराडे, सीसीसीसी डॉ. अंजली गवारले, कार्यकारी मंडळात साधना नागपाल, वर्षा मानवटकर, डॉ. किरण चव्हाण, क्रांती धोटे तसेच क्लबच्या सदस्या विद्या ब्राह्मणकर, स्मिता बोबडे, विजया धोटे, मोहिनी कुडमेथे, सीमा ठोकळ, करुणा चव्हान, प्रीती उपरे, प्रज्ञा उराडे, सायली कोथळे यांना क्लबच्या अध्यक्षांनी पदग्रहण केले. या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना क्रांती धोटे यांनी साडीचोळी दिली. दारूबंदी, व्यसनमुक्तीवर महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संगीता पवार यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शुभांगी भोयर यांनी केले. प्रस्तावना क्लबच्या अध्यक्ष प्रतिभा मुळे यांनी केले. आभार सचिव अबोली डिक्कर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...