आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:शिवसेना शिंदे गटाच्या नवे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बाळासाहेबांची शिवसेना’चे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून पक्ष सचिव संजय मोरे यांनी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. माधवा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते, अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यात हरिहर लिंगनवार यांची यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तीन जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात श्रीधर मोहोड यांच्याकडे यवतमाळ, दिग्रस, उमरखेड विधानसभा, गजानन बेजंकीवार यांच्याकडे आर्णी व वणी तर ॲड. उमाकांत पापीनवार यांच्याकडे पुसद, राळेगाव विधानसभेची जबाबदारी देत त्यांची जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुख म्हणून विनोद खोडे (पाटील), प्रवीण निमोदिया, राजकुमार वानखडे, दीपक काळे, डॉ. बाबूसिंग चव्हाण, विष्णू उकंडे, सुधाकर गोरे, सचिन महल्ले यांची निवड झाली आहे.

विधानसभा सहसंपर्क प्रमुखपदी गोपाळ पाटील (यवतमाळ विधानसभा), रमेश अगरवाल (राळेगाव), चितांगराव कदम (उमरखेड), भाऊराव ढवळे (दिग्रस), राजुदास जाधव (आर्णी व पुसद) आणि विनोद मोहितकर (वणी) यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका प्रमुख म्हणून योगेश वर्मा, मनोज नाल्हे, मनोज सिंगी, गुणवंत ठोकळ, उत्तम ठवकर, संजय बयास, प्रवीण पाटील मिरासे, संतोष जाधव, राजू राठोड, राजेंद्र जाधव, नीलेश चव्हाण, जयवंत बंडेवार, विशाल किन्हेकर, किशोर नांदेकर, मारेश्वर सरोदे, मनोज भोयर, अभिषेक पांडे, वसंता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका संघटक पदी अरूण वाळके, सुरेश ढेकळे, कपिल पाटील, गणेश पागीरे, अरविंद मिश्रा,

सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर रहा
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हीच आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद आहे. सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे. बाळासाहेबांची शिवसेना या आपल्या पक्षाच्या संघटन वाढीसाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे.
-संजय राठोड, पालकमंत्री

बातम्या आणखी आहेत...