आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी:दोन कोटींच्या टंचाई‎ आराखड्याला मंजुरी‎​​​​​​​

यवतमाळ‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यातील‎ बहुतांश गावे पाण्यासाठी स्वयंभू‎ झाले. परिणामी, टंचाईच्या कृती‎ आराखड्याला चांगलीच कात्री‎ लागली आहे. जिल्हा परिषद‎ पाणीपुरवठा विभागाने २ कोटी १५‎ लाख ८० हजार रुपयांच्या संभाव्य‎ पाणी टंचाईचा कृती आराखडा‎ जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावित केला‎ होता. या प्रस्तावाला‎ जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ग्रीन सिग्नल’‎ दिला असून, आयुक्तालयात तो‎ मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.‎ त्यामुळे यंदा टँकरची संख्या नक्कीच‎ घटणार असल्याचे दिसून येत आहे.‎

मागिल वर्षी जिल्ह्यात सरासरी‎ पेक्षा अधिक पाऊस झाला. शंभराहून‎ अधिक महसूल मंडळात मुसळधार‎ पाऊस झाल्याने पाण्याची पातळी‎ बऱ्यापैकी वाढली आहे. यासोबतच‎ जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या‎ माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे‎ सुरू आहेत. यातील अर्ध्याहून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधिक कामे पूर्णत्वास आले आहे.‎ तर काही कामे सध्या प्रगतीपथावर‎ आहेत. नियमीत टंचाईग्रस्त राहणारे‎ गावे पाण्यासाठी आता स्वयंभू‎ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.‎ त्यामुळे पाणी टंचाईच्या संभाव्य कृती‎ आराखड्याला कात्री लागल्याचे‎ दिसत आहे. गतवर्षी खासगी विहिर‎ अधिग्रहण, टँकर, नळ योजना विशेष‎ दुरूस्ती, तात्पूरती पूरक नळ योजना,‎ विहिर खोलीकरण, गाळ काढणे‎ आदींचा मिळून ७ कोटी ४० लाख‎ ४७ हजार रुपयांचा आराखडा होता.

‎यंदा मात्र, तात्पूरती पुरक नळ योजना,‎ नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना कात्री लावण्यात आली. तर‎ जानेवारी ते जून महिन्यापर्यंत २५६ गावात २७४ खासगी‎ विहिर अधिग्रहण एक कोटी ६४ लाख रूपये, विहिर‎ खोलीकरण, गाळ काढणे एक काम पाच लाख आणि १२‎ गावात टँकर ४६ लाख ४० हजार, असे मिळून दोन कोटी‎ १५ लाख ८० हजार रूपयांचा संभाव्य पाणी टंचाईचा कृती‎ आराखडा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने‎ जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी प्रस्तावित केला होता.‎ प्रस्तावित आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन‎ सिग्नल दाखविला आहे. आता मंजुरीसाठी‎ आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.‎

पावसाळ्यापूर्वी होणार‎ ९० टक्के कामे‎
सध्या जलजीवन मिशनची कामे‎ गतीमान पद्धतीने सुरू‎ आहे.टंचाईग्रस् त गावात‎ विहीर,पाण्याची टाकी यासह‎ प्रत्येकाला नळ कनेक्शन दिल्या‎ जात आहे.अशा टंचाईग्रस्त ९०‎ टक्क्याहून अधिक गावातील कामे‎ पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या‎ दृष्टीने पाणी पुरवठा विभागाने पावले‎ उचलले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...