आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात विशेष मोहिम:13 एप्रिल ‘सलोखा योजना‎ दिवस'' म्हणून करणार साजरा‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा‎ ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या‎ शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा‎ पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन‎ धारकांचे अदलाबदल दस्तासाठी शासनाने‎ सलोखा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या‎ प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ''१३‎ एप्रिल'' हा ''सलोखा योजना दिवस'' म्हणुन‎ साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील‎ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्याना सदर योजनेचा‎ लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम‎ राबवण्यात येणार आहे.‎

शेतजमीनीचा ताबा व वहिवाटीबाबत‎ शेतकऱ्यांचे आपापसातील वाद मिटविण्यासाठी‎ व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन‎ एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस‎ लागण्यासाठी शासनाने ही योजना लागु केली‎ आहे. ही योजना दोन वर्षासाठी लागू राहील.‎ एकमेकांच्या नावावर शेत जमिनीचा ताबा‎ असणा-या शेतजमीन धारकांचे अदलाबदल‎ दस्तासाठी नाममात्र मुद्रांक शुल्क एक हजार‎ रुपये आकारण्याबाबत सवलत सलोखा योजनेत‎ देण्यात आली आहे. शासन निर्णयामध्ये‎ राज्यातील प्रत्येक गावांमध्ये अंदाजे ३ प्रकरणे‎ असण्याबाबत नमुद करण्यात आलेले आहे.‎ त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये २१५९ महसुली‎ गावांमध्ये अंदाजे ६४७७ एवढी प्रकरणे‎ असण्याची शक्यता आहे.