आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरखेड शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद व सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड यांच्यामार्फत अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरवण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत कामांमध्ये नियमांना तिलांजली देत संबंधित ठेकेदारांकडून कामे होत असतांना सार्वजनिक बांधकाम उपविभाग गांधारीची भुमिका बजावत असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे. उमरखेड नगर पालिका हद्दीत संत चोखामेळा वार्ड येथील विनोद पराते ते संजय इंगोले यांच्या घरापर्यंत जाणारा सी.सी रोड तयार करणे व पुरुषोत्तम काळे यांच्या घरापासून उकंडा लांबटीळे यांच्या घरापर्यंत जाणारा सी.सी रस्ता व लाधिकरण करणे हे काम कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२२-२३ जा. क्र. ५२०९ या पत्राद्वारे सहाय्यक संचालक माहिती व जनसंपर्क संचालक महाराष्ट्र शासन यांना ई- निविदा सूचना क्र १८ /२०२२-२३ ही वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे विषयी विनंती अर्ज केला त्या विनंती अर्जावर वरील प्रमाणे निविदा काम क्र. १७ मध्ये विनोद पराते ते संजय इंगोले यांच्या घरापर्यंत सी.सी रोड तयार करणे व पुरुषोत्तम काळे यांच्या घरापासून उकंडा लांबटिळे यांच्या घरापर्यंत जाणारा सी .सी रस्ता व लाधिकरण करणे असे नमूद आहे. असताना सुद्धा सदर जागेवर संबंधित ठेकेदाराने निविदा क्र. १८ /२०२२-२३ काम क्र. १७ मध्ये नमूद असल्याप्रमाणे काम न करता दोन्ही रस्त्यांवर फक्त लाधिकरणाचे काम करून कामात भ्रष्टाचार करून ,शासनाने दिलेल्या अटी शर्यतींचे व नमूद करून दिलेले काम न करता, मनमानी स्वरूपाचे काम करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. उमरखेड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी असे तक्रार निवेदनातून मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.