आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पीयूसी केंद्रांच्या मनमानीला बसणार चाप; चाचणी केंद्रावर सुधारित दरपत्रक लावण्याचे दिले निर्देश

यवतमाळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहनांच्या वायुप्रदूषण चाचणीसाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृत दर निश्चित केले आहेत. यापूर्वी पी यूसी तपासणी केंद्रचालक मनमानी पद्धतीने दर आकारणी करत होते. आता नवे दरफलक प्रत्येक केंद्रावर लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पी यूसी तपासणी केंद्राचालकांच्या मनमानीला चाप लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. २५ एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशानुसार पी यूसी चाचणीच्या दरांमध्ये सुधारणा करुन दरवाढीस मंजुरी दिली आहे. आता वाहनांची वायुप्रदुषण चाचणी करुन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्यासाठी नवे दर निश्चित केले आहेत.

यापूर्वी या प्रमाणपत्रासाठी वाहनधारकांना केंद्रचालक सांगतील ती रक्कम मोजावी लागत होती. कारण अचानकपणे वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी झाली तर पीयुयी प्रमाणपत्र नसल्यास हजार रुपयांचा दंड भरावा लागत होता. त्यामुळे वाहनधारक केंद्रचालक सांगतील ती रक्कम भरून प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करायचे.

बातम्या आणखी आहेत...