आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:आरेगाव बु. नाल्यावर पुलाचे‎ बांधकाम करा अन्यथा उपोषण‎

पुसद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद‎ तालुक्यातील आरेगाव बु. येथील रस्त्यातून जाताना‎ नाल्यावर पूलच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून‎ पुलाचे बांधकामाची मागणी करून देखील कोणीही‎ लक्ष देत नाही. नाल्यावर पुलाचे बांधकाम तात्काळ‎ करून देण्यासाठी गावकऱ्यांनी आता पंचायत‎ समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदाराला‎ निवेदनातून साकडे घातले आहे. नाल्यावर पुलाचे‎ बांधकाम न केल्यास उपोषणाला बसणार‎ असल्याचा इशारा गावकऱ्यांनी निवेदनातून दिला‎ आहे.‎

आरेगांव बु. येथे स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता‎ आहे. परंतू गाव ते स्मशानभूमीपर्यंत जो नाला‎ (ओढा) आहे. त्या नाल्यावर पुल नसल्यामुळे‎ गावामध्ये एखादे मयत झाल्यास त्याला‎ स्मशानभूमीत नेण्यासाठी तारेवरची कसरत‎ तिरडीला खांदा देणाऱ्यांना करावी लागते. तिरडी‎ घेऊन जातांना खांदा देणाऱ्यांची होणारी अवकळा‎ पाहून मयतांचे तिरडीला खांदा द्यायलाही कुणी‎ तयार होत नाही. पुल नसला तरीही सतत‎ वाहणाऱ्या, खळखळत्या पाण्यामधूनच प्रेत घेऊन‎ अंत्यविधी तर करावा लागतो.

त्यासाठी मात्र जीव‎ मुठीत धरून खुप अवघड प्रवास करुन तिरडीवर ते‎ प्रेत घेवून खांदा देणाऱ्याला अंत्ययात्रेत हजर व्हावे‎ लागते. तसेच कधी कधी तर पावसाळ्यामध्ये तर‎ पाणी पडल्यामुळे नाल्याला पूर असल्यास‎ अंत्यविधी प्रक्रिया करतांना तर खुपच त्रास सहन‎ करावा लागतो. अंत्यविधी नाल्याला आलेले पुराचे‎ पाणी ओसरल्या नंतरच दुसऱ्या दिवशी‎ अंत्यसंस्कार करावा लागतो.

ज्या कुणाच्या घरचा‎ व्यक्ती मरण पावतो, त्या घरी मयत झालेल्या‎ व्यक्तीचे दु:ख तर असते‎ पण मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी पार‎ पाडण्यासाठी होणारा जीवघेणा प्रवास समोर पाहून‎ अजून दुःखाचा डोंगर व शासनाच्या‎ हलगर्जीपणामुळे आरेगांव बु. येथील गावकऱ्यांना‎ सहन करावा लागत आहे. त्यामुळे गट विकास‎ अधिकारी गजानन पल्लेवाड व तहसीलदार राजेश‎ चव्हाण यांनी गावच्या समस्येकडे गांभीर्यपूर्वक लक्ष‎ वेधून घ्यावे अशी विनंती निवेदनातून केली आहे.‎ सदर कार्यवाही १५ दिवसाचे आत न झाल्यास‎ स्मशान भूमीमध्ये सर्व गावकरी आमरण उपोषणास‎ बसणार आहेत.येथे दिलेल्या निवेदनावर नितिन‎ सरोदे, उत्तम कांबळे, अरुण कांबळे, प्रभाकर‎ जोगदंड यांच्या सह्या आहे.‎

बातम्या आणखी आहेत...