आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी पेटवली:क्षुल्लक कारणावरून वाद, चहा कॅन्टीन चालकाची दुचाकी पेटवली; शहरातील मेडीकल कॉलेज चौकातील प्रकार, शहर ठाण्यात गुन्हे नोंद

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका चहा कॅन्टीन चालकाची दुचाकी जाळण्यात आली. ही धक्कादायक घटना शहरातील मेडीकल कॉलेज चौकात रविवार, दि. २० मार्चला रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी रेहांश आगरे वय २६ वर्ष रा. वैभव नगर याच्या विरोधात शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या अनिल कुरमेलकर यांची मेडीकल कॉलेज चौकात चहा कॅन्टीन आहे. रविवारी रात्री त्यांच्या कॅटींगवर वैभव नगरातील रेहांश आगरे या युवक आला होता. त्या युवकाने कुरमेलकर यांची दुचाकी काही कामानिमीत्त मागितली होती. मात्र कुरमेलकर यांना बाहेर जायचे असल्याने दुचाकी दिली नाही.

त्यामूळे संतापलेल्या रेहांश याने अश्लील शिविगाळ केली. त्यानंतर दुचाकीची तोडफोड करीत ती दुचाकी जाळून हजारो रूपयांचे नुकसान केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी रेहांश आगरे याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...