आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्राने वार:क्षुल्लक कारणावरून वाद, महिलेच्या गळ्यावर शस्त्राने वार

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात एका ३५ वर्षीय तरुणाने महिलेच्या गळ्यावर शस्त्राने वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना यवतमाळ-नागपूर मार्गावर असलेल्या वीटभट्टी परिसरात शनिवार, १९ मार्चला सायंकाळी ४ वाजता घडली. शाहरूख खान बहादूर खान वय २४ रा. नेताजी नगर असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, शहरातील नेताजी नगर परिसरातील शाहरूख खान या तरुणाची गेल्या काही वर्षांपासून तलाव फैल येथील ३५ वर्षीय महिलेसोबत ओळख होती. त्यानंतर शाहरूखचे तिच्या घरी जाणे येणे सुरू झाले. त्यानंतर शाहरूख तिच्याच घरी राहत होता. मध्यंतरी या महिलेने मोहा परिसरात एक खोली भाड‌्याने केली होती. त्या रूमवरून शनिवारी सायंकाळी शाहरूख आणि तिचा यवतमाळ-नागपूर मार्गावर असलेल्या वीटभट्टी परिसरात वाद झाला. रागाच्या भरात शाहरूखने स्वत:जवळील कटरने तिच्या गळ्यावर वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुचाकी घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत याबाबत पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान जखमी महिलेला तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर गुन्हे तपास पथकाने शाहरूख खानला ताब्यात घेतले. ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र वृत्त लिहीपर्यंत याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...