आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परस्परविरोधी तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे‎:धुऱ्यावरील लिंबाचे‎ झाड तोडण्यावरून वाद‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातील धुऱ्यावर असलेले‎ लिंबाचे झाड तोडण्यावरून वाद‎ निर्माण हाेऊन दोन गटात‎ हाणामारी झाली. ही घटना‎ उमरखेड तालुक्यातील डोंगरगाव‎ शेतशिवारात शनिवारी सायंकाळी‎ घडली. या प्रकरणी परस्पर‎ विरोधी तक्रारीवरून पोफाळी‎ पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील‎ १२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात‎ आला.‎ या प्रकरणी सत्यभामा सूर्यवंशी‎ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,‎ उमरखेड तालुक्यातील डोंगरगाव‎ शेतशिवारात सत्यभामा सूर्यवंशी‎ यांचे शेत आहे. शनिवारी‎ शेतातील धुऱ्यावर असलेले‎ लिंबाचे झाड तोडत असताना‎ नरसिंग सूर्यवंशी यांच्यासह पाच‎ जणांनी त्या ठिकाणी येऊन‎ सत्यभामा सूर्यवंशी यांच्यासोबत‎ वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ‎ करत विळ्याने डोक्यावर मारून‎ जखमी केले.

या प्रकरणी पोफाळी‎ पोलिसांनी नरसिंग सूर्यवंशी‎ याच्यासह पाच जणांवर विविध‎ गुन्हे नोंदवले. तर नरसिंग सूर्यवंशी‎ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,‎ सत्यभामा सूर्यवंशी यांच्यासह‎ पाच जणांनी शेतातील धुऱ्यावर‎ असलेले लिंबाचे झाड‎ तोडण्याच्या कारणावरून नरसिंग‎ सूर्यवंशी यांना घरी जात असताना‎ वाटेत अडवले. दरम्यान‎ त्यांच्याशी वाद घालून मारहाण‎ करत जिवे मारण्याची धमकी‎ दिली. या प्रकरणी पोफाळी‎ पोलिसांनी सत्यभामा सूर्यवंशी‎ यांच्यासह पाच जणांवर विविध‎ कलमान्वये विविध गुन्हे नोंदवले‎ आहेत. याप्रकरणी अधिक तपास‎ पोफाळी पोलिस करत आहे.‎