आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू असलेल्या रक्तदान शिबिरामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्ताची निम्मी गरज भागवली जाते. हे रक्तदान शिबिर जय माँ आरोग्य सेवा समितीमार्फत अविरत सुरू आहे. त्या समितीस आणि शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहे. हा दुग्धशर्करा योग आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राठोड यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. कार्यक्रमास पालकमंत्री संदीपान भुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राठोड म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या तत्त्वाने आमची वाटचाल सुरू आहे. २५ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये ‘माँ आरोग्य सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे कार्य बघून याच परिसरात ‘मातोश्री’ प्रतिक्षालय स्थापन करण्यासाठी शासनानेही जागा उपलब्ध करून दिली, असेही ते म्हणाले.
यावेळी कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, संचालक राजुदास जाधव, विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, बळीराम मुटकुळे, राजेश खामनेकर, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, संजय निखाडे, दीपक कोकास, बाळासाहेब चौधरी, हरिहर लिंगणवार, चितगराव कदम आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.