आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील घोन्सा मार्गावर असलेल्या एका गोदामात एलसीबी पथकाने धाड टाकून मालवाहू वाहनासह १७ लाखाहून अधीक रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार, दि. ५ फेब्रुवारीला दुपारी करण्यात आली असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून शेख मजीद शेख नजीर वय ५२ वर्ष रा. बदकी भवन, मारेगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मारेगाव शहरातील घोन्सा मार्गावर असलेल्या बदकी भवनमागील एका गोदामात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू साठवून होता. याबाबतची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती.
त्यावरून रविवारी एलसीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्या गोदामावर धाड टाकली. यावेळी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि एमएच-२९-बीई-२४५३ मालवाहू टाटा एस वाहन असा एकूण १७ लाख ६० हजार ४६२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करीत एलसीबी पथकाने मजीद शेख याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीतील सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंदे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, उल्हास कुरकुटे, नीलेश निमकर, सतीश फुके, यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.