आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावा क्षात्रवीर सेनेची मागणी:शेतकऱ्यांच्या मालावर डल्ला‎ मारणाऱ्यां चा बंदोबस्त करा‎

मारेगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारेगाव तालुक्यातील पहिलेच शेतकरी‎ ओला दुष्काळामुळे हवालदिल झाला आहे.‎ शेतकऱ्याचां माल निघण्याला सुरुवात झाली‎ असून कापूस, सोयाबीन इत्यादी माल मोठ्या‎ प्रमाणत निघत आहे असून घुरट्या चोरांची‎ सुरवात झाली आहे. दोन दिवसापूर्वी‎ कोलगाव येथील सुनील पारखी यांच्या‎ शेतातील सोयाबीन चोरीला गेले आहे. अशा‎ प्रकारे शेतकऱ्यांच्या माल चोरीला जाणार‎ आहे. म्हणून छावा क्षात्रवीर सेनेच्या‎ शिष्टमंडळाने मारेगाव ठाणेदार राजेश पुरी‎ यांची भेट घेऊन चर्चा केली. चोरांचा‎ बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनातून‎ प्रदेश अध्यक्ष अनिल पारखी यांनी केली‎ आहे.

यापुढे कोणात्याही शेतकऱ्यांच्या‎ शेतातील माल चोरीला गेला तर छावा‎ क्षात्रवीर सेना आंदोलन करेल याची दखल‎ पोलिस प्रशासनाने घ्यावी, असा इशारा‎ देण्यात आला.‎ छावा क्षात्रवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष‎ समाधान सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ प्रदेश अध्यक्ष अनिल पारखी, महीला प्रदेश‎ अध्यक्ष संगीता डाहुले, विशाखा राजूरकर,‎ महिला विदर्भ अध्यक्ष प्रतिभा तातेड, विदर्भ‎ अध्यक्ष विलास बूरान, विदर्भ संपर्क प्रमुख‎ विनोद आवारी, जिल्हा अध्यक्ष राजू‎ जुनगरी, तालुका अध्यक्ष अनंता घोटेकर,‎ राजू धाबेकर, अभिषेक उपरे, पृथ्वीराज‎ घोटेकर, सुहास वासाडे, प्रणय पारखी,‎ सारंग खुसपूरे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...