आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बोरगडी येथील सरकारी स्मशान भूमीत गावकऱ्यांनी शकुंतलाबाई ढगे यांच्यावर अंत्यसंस्कार करीत असताना आशाताई कदम व त्यांच्या साथीदारांनी अंत्यविधी करण्यास मज्जाव केला. सरणावर बसून जातीवाचक शिवीगाळ करून वादंग निर्माण केल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर गावकरी तथा समाजाच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
त्यावरून ॲट्रॉसिटीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले. परंतु एवढी गंभीर घटना घडवून सुद्धा आरोपीस अटक केली नाही. यामुळे गावात व समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावे, या मागणीसाठी दि. २ डिसेंबरला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी यांना विविध संघटनेकडून करून निवेदन देण्यात होते. यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, लक्ष्मण कांबळे, बाबाराव उबाळे, दिनेश खांडेकर, राजेश ढोले,अशोक ढोले, अर्जुन भगत, नितेश खंदारे यांच्यासह गीता कांबळे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.