आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमंत्रण‎:अरुणावतीची उघडे तीर देत‎ आहेत अपघाताला निमंत्रण‎

मानोरा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर आणि तालुक्याची जीवन‎ वाहिनी असलेली अरुणावती नदी ‎ मानोरा शहराच्या उत्तर दिशेकडून‎ वाहत खाली दुसऱ्या जिल्ह्यामध्ये‎ जात आहे.‎ शहरी आणि ग्रामीण‎ नागरिकांच्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या ह्या अरुणावती नदीच्या‎ रुद्रावताराचा सामना सुद्धा मागील‎ अनेक वर्षांपासून मानोरा शहर‎ आणि तालुक्यातील साखरडोह,‎ रोहना, हिवरा, जवळा, कोंडोली,‎ तळप रामतीर्थ, कारखेडा, सेवादास‎ नगर, वरोली या व इतरही गावातील‎ नागरिकांना सहन करावा लागतो.‎

समृद्ध जल राशीने शेतकऱ्यांच्या‎ जीवनाला सुजलाम सुफलाम‎ करणाऱ्या अरुणावती नदीमुळे‎ दरवर्षी जीवित व वित्तहानीला सुद्धा‎ नागरिकांना सामोरे जावे लागते.‎ मानोरा शहर नगरपंचायत‎ हद्दीतील ह्या अरुणावतीच्या नदी‎ तीरावर वार्ड क्रमांक एक मधील‎ माता भगिनी पावसाळा, हिवाळा‎ असो की उन्हाळा आपल्या घरातील‎ ‎ ‎ ‎ कपडे व इतर स्वच्छतेची कामे‎ करण्यासाठी दररोज जात असतात.‎ वार्ड क्रमांक एक हद्दीमधून जात‎ असलेल्या अरुणावतीच्या ह्या नदी‎ तीरावर सबंधित विभागाने सिमेंट‎ काँक्रीटचे घाट बांधून माता-भगिनी‎ आणि नागरिकांचे जीव संभाव्य‎ धोक्यापासून वाचवण्याचे आवाहन‎ नागरिकांकडून केले जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...