आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुसदच्या राजाला तब्बल 126 वर्षांची ऐतिहासिक परंपरा

पुसद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसदचा राजा म्हणून लोकांनी उपाधी दिलेल्या माळीपुरा गणेश मंडळाला १२६ वर्षे पूर्ण झाली. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ मोरे यांनी आझाद हिंद सेना खाली सर्व समान, सर्वांना एकत्र करून स्वातंत्र्य चळवळ ओढून घेतली. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या कर्म वीरांच्या आजही गणेशोत्सवाच्या काळात आठवणी ताज्या आहेत.

माळीपुरा गणेश मंडळ म्हणून पुसद येथे सन १८९६ साली स्थापन झाले होते. सर्वात जुने गणेश मंडळ म्हणून विदर्भातून पहिला आणि राज्यातून चौथा क्रमांक माळीपुरा गणेश मंडळाचा आहे. मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सिंह बयास यांनी त्यांच्या काळात लोक कलेचे संगोपन जपले. सोबतच भजने, पथनाट्य, विष्णूच्या दहा अवताराचे दर्शन भक्तांना घडवून दिले. सर्व धर्म समभावाची संकल्पना मंडळाने जोपासली होती. माळीपुरा गणेश मंडळात येऊन खुद्द लोकमान्य टिळकांनी आशिर्वाद घेतला होता. लोकमान्य टिळकांनी पूस नदी पात्रामध्ये त्यावेळेस संबोधन केले होते. त्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. माळीपुरा गणेश मंडळाची मूर्ती पारंपारिक पद्धतीने व मातीनेच कुंभाराकडून बनविला जात होती. ती परंपरा आजही कायम आहे. मूर्तीची स्थापना, विसर्जन पारंपारिक वाद्याने पालखीतून केले जात होते. विठ्ठल महाजन, शेषराव पाटील गणेश मंडळाच्या दोन मिरवणुकी पूर्वी निघत होत्या. दोन्ही मिरवणुकी पुसदकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.

विसर्जनादरम्यान तलवारी, भाल्याचे खेळ दाखविल्या जात होते. स्वातंत्र्याच्या काळात नारायण मडके, दत्तराव मडके, नारायण गवळी यांच्यासह अनेकांनी रामायण, महाभारतातील कथा, त्यांचे पात्र स्वतः साकारून समाज प्रबोधन केले. बापूराव महाजन, विठ्ठल महाजन यांनी लोकनृत्य करून लोकांची मनी जिंकली होती. गणबादेव गणेश मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शेषराव पाटील असताना पाटलाच्या गणेश मंडळाला पहिला मान त्यावेळी दिला गेला. लोकांनीच पुसदचा राजा म्हणून उपाधी दिली.

माळीपुरा गणेश मंडळाला पुसदचा राजा म्हणून उपाधी दिली, ही अभिमानाची गोष्ट आहे. सन १९९५ साली मंडळाचे शताब्दी वर्ष असताना मला अध्यक्ष केले. त्यावेळेस समाजकार्य, प्रबोधनाचा वारसा पुढे चालविला. लोकांपर्यंत परंपरेसह पारंपारिक कला पोहोचवण्याचे काम केले. यंदा मंडळाने १२७ व्या वर्षात पदार्पण केल्याने दररोज महाआरती केली जात आहे. भक्तांनी मंडळात येऊन महाआरतीचा लाभ घ्यावा.कृष्णाजी राऊत, अध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...