आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दविसांपूर्वी वाढलेले सोयाबीनचे दर कोसळले आहेत. त्याचा आर्थिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरात घसरण झाल्याने बाजारात येणाऱ्या सोयाबीनची आवक कमी झाली आहे. कापसापाठोपाठ आता सोयाबीनचेही दर घसरले आहेत. सोमवारी, ५ डिसेंबर रोजी सोयाबीनचे दर पाच हजार होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधे संभ्रम निर्माण झाला आहे. तर काही शेतकऱ्यांनी भाववाढीची प्रतीक्षा करत सोयाबीन साठवून ठेवले आहे.
गेल्या वर्षीचा सोयाबीनचा हंगाम संपताच सोयाबीनची विक्रमी भाववाढ नोंदवली गेलेली होती. या भाववाढीचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक झाला होता. यंदा सोयाबीनला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात घट झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलेले होते. हळूहळू दरात सुधारणा होत गेली. सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांवर पोहोचलेले होते. मात्र, आता दरात घसरण सुरू झालेली दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात कापसाच्या दरातही मोठी घसरण पाहावयास मिळाली. कापसानंतर आता सोयाबीनचे दरदेखील खाली आलेले आहेत. साडेपाच हजारांच्या पुढे असलेले दर आता पाच हजारांवर आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
आधीच खरीप हंगामात अतविृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत अतविृष्टीने फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमधील हे पीक उद्ध्वस्त झालेले आहे. शेतात राहिलेल्या सोयाबीनचा शेतकऱ्यांना आधार आहे. सोयाबीनचा तुटवडा पाहता विक्रमी दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. सध्याचे भाव पाहता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणीच फिरले गेले आहे. सोयाबीनचे दर आता पाच हजार रुपयांच्या खाली पोहोचल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी कापसानंतर आता सोयाबीन घरातच ठेवलेले आहे. शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत असून, दर वाढल्याशविाय शेतमाल विकायचा नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली दिसून येत आहे. बाजारात शेतमालाचे भाव घसरत असल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. दरवाढतील असा काहींचा अंदाज आहे, तर काहींच्या मते यापेक्षा खाली दर गेल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतमाल आता विकावी की प्रतीक्षा करावी, अशा वविंचनेत शेतकरी दिसत आहेत.
सोयाबीनची आवक घसरली नोव्हेंबरच्या पहिले तीन आठवडे बाजार समितीत सोयाबीनचे चार हजारावर पोत्यांची आवक होती. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण होत गेली. त्यानंतर सोयाबीनची एक हजार पोत्यांची आवक होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आवक खूप कमी प्रमाणात आहे. अजय येंडे, सचवि, कृउबा समिती
मशागतीसाठी लागलेला खर्चही निघाला नाही तीन एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन पेरले होते. मात्र ७ पोते झाले. बाजार भाव लक्षात घेता सद्या विकून फायदा नाही. मशागतीसाठी जवळपास ५० हजार खर्च झाला. सोयाबीनच्या उत्पादनातून मशागत खर्चही निघाला नाही. वैष्णव पाथोडे, शेतकरी,
सोयाबीन उत्पादनात सुमारे ५० ते ६० घट यावर्षी सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही. यंदा जिल्ह्यात २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यापैकी सुमारे १ लाखावर हेक्टरवरील क्षेत्राला जबर फटका बसला व त्यामुळेच सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ५० ते ६० टक्के घट आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.