आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोकस:डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुमाऐवजी मातीचा भर; ठेकेदाराकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप

पुसद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद नगर परिषदेमार्फत शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. सोबतच गट्ट बसवण्याचे काम झाले. सध्या अनेक ठिकाणी काम सुरू आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांपैकी तहसील कार्यालय ते नगर परिषद मराठी शाळा क्र. २ यासह मुखे यांच्या हवेली पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही कडेला भर म्हणुन माती किंवा टाकाऊ मटेरियल टाकण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. रस्त्याच्या कामाबाबत कंत्राटादाराविरोधात आक्षेप घेताच रस्त्याच्या दोन्ही कडेला आता मुरूम टाकल्या जात आहे.

नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. डांबरी रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आलेल्या माती व वेस्ट मटेरियलमुळे ते रस्ते अपघात प्रणव स्थळ बनला आहे. रस्त्यावरून ये जा करतांना वाहनचालक व पायदळ करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते कामाच्या एस्टिमेट मध्ये रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्याचा उल्लेख आहे. मात्र त्या एवजी मातीचा वापर केला जात आहे. शहरातील काही भागात डांबरीकरण झालेल्या रस्त्यांच्या कडेला गट्ट बसविण्यात आले आहे.गटटु बसवण्याच्या काम देखील निकृष्ट दर्जाचे होत आहे.काम पुर्ण होण्यापूर्वीच गट्ट निघत आहे.याकडे मात्र न.प.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अत्यंत वर्दळीच्या व शाळा महाविद्यालय असलेल्या भागात गट्ट बसवण्याची गरज होती. मात्र गट्ट किंवा मुरूम ऐवजी माती टाकण्यात येत असून नगर परिषदेच्या संबंधित अभियंत्यांकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकवला यांनीच जातीने लक्ष देण्याची मागणी आता जोर धरल्या जात आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे
रस्त्याचे डांबरीकरण व गट्टु बसवण्याच्या कामात अभियंता सोबत कंत्राटदाराने संगणमत भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचारामुळे निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे.अत्यंत वर्दळीच्या व शाळा महाविद्यालय असलेल्या भागात गट्ट बसवण्याची गरज होती.गट्टु काम होण्यापूर्वी उखडत आहे. मुख्याधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे
भारत पाटील, भाजपा

ठेकेदाराला नोटीस बजावली
ठेकेदाराकडून गट्ट बसण्याची काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या गटटुची उंची देखील रस्त्या पेक्षा जास्त आहे. कामाची पाहणी केल्यानंतर ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.-डॉ.किरण सुकलवाड, मुख्याधिकारी,न.प.पुसद

बातम्या आणखी आहेत...