आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णी शहरातील घटना:क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहक बोलावण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ५२ वर्षीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना आर्णी शहरातील प्रेमनगर चिकन मार्केट परिसरात शनिवार, दि. ३१ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी आयुब खान जंगलू खान (४५) याच्यासह अन्य दोघांवर आर्णी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, आर्णी शहरातील प्रेम नगरात असलेल्या चिकन मार्केटमध्ये अफसर अजीस कुथे या व्यक्तीसोबत आयुब खान जंगलू खान याच्यासह इतर दोघांनी चिकन दुकान विक्रीचे ग्राहक बोलवण्याच्या कारणावरून वाद घातला. दरम्यान, शिविगाळ करत लोखंडी रॉडने हल्ला चढवला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात अफसर अजीस कुथे गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्णी पोलिस करत आहे.

विडूळ-देवसरी मार्गावर चाकू हल्ला
उमरखेड तालुक्यातील विडूळ-देवसरी मार्गावर एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाच्या अंगठ्याला चाकू लागल्याने तो जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून अभिजीत धुळे रा. विडूळ असे जखमी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजरतन उर्फ चिंटू इंगोले वय २४ वर्ष रा. विडूळ याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरखेड पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...