आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांवर रुग्णाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जिल्हा रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. अभिषेक झा आणि जेबीस्टन पॉल असे गंभीर जखमी असलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. यवतमाळ जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टर अभिषेक झा आणि जेबीस्टल पॉल वॉर्ड क्रमांक २५ मध्ये कर्तव्य पार पाडत होते. यावेळी एका रुग्णाने अचानक दोन्ही डॉक्टरांवर चाकूने हल्ला केला. यात एका डॉक्टरच्या हाताला जखम झाली तर दुसऱ्या डॉक्टरच्या गालावर, गळ्यावर गंभीर जखमा झाल्या.
घटनेची माहिती रुग्णालयात पसरताच संपूर्ण डॉक्टरांनी एकत्र येत काम बंद केले. रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करत रुग्णालयात येणारी व बाहेर जाणारी वाहने थांबवली. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, ठाणेदार नंदकुमार पंत यांनी धाव घेत जखमी डॉक्टरांच्या प्रकृतीची पाहणी केली. डॉक्टरांनी नारेबाजी करत रुग्णालयाचे डिन आणि पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला. डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद करत जोरदार घोषणाबाजी केली. या डॉक्टरांशी पोलिस अधीक्षकांनी चर्चा केली.
गेल्यावर्षी झाली होती डॉक्टरची हत्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील शिकाऊ डॉ. अशोक पाल यांचीवर्षभरापू र्वी रुग्णालय परिसरात हत्या करण्यात आली होती. त्यावेळी हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी बरेच दिवस डॉक्टरांनी आंदोलन पुकारले होते. त्यानंतर मारेकरी अटक करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी रुग्णालयात डॉक्टरवर प्राणघातक हल्ल्याची ही दुसरी धक्कादायक घटना घडली.
सुरक्षा यंत्रणा पडतेय अपुरी जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आहे.मध्यंतरी झालेल्या डॉक्टरच्या खुनाच्या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा मजबूत करुन सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.मात्र गुरुवारी रात्री घडलेली घटना पाहता ही सुरक्षा यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे.
महिनाभरापूर्वी दोन गटात हल्ला जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटात सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाल्याने सर्वत्र व्हायरल होत होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने दहा जणांवर गुन्हा दाखल केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.