आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा६७ वर्षापासून सातत्याने श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करणारे हनुमान आखाडा चौक स्थित हनुमान मंदिरात जन्मोत्सवाचा शुभारंभ कीर्तन महोत्सवाने करण्यात आला. उद्घाटन बोपापूरवासी महंत अंबिकामाता यांचे शुभहस्ते पार पडले. उद्घाटनीय आशिर्वादपर संबोधनात शारीरिक बल व मानसिक शकतीची देवता श्री हनुमान आहे. त्यांची उपासना करा, अशा उपक्रमाने समाजात भक्तीची भावना दृढ तर होतेच सोबतच सामाजिक सलोखा, देव, देश व धर्माप्रती दायीत्वाची भावना वृध्दिंगत होते. समाजाला अशाच प्रबोधनपर उपक्रमाची गरज आहे. हनुमंताची दिव्य शक्ती आपणास सतत प्रेरित करो, असा आशिर्वाद त्यांनी या प्रसंगी दिला.
किर्तन महोत्सवातील प्रथम पुष्प गुंफताना श्रध्दा समर्पण आणि भाव हिच भक्तीची बलस्थाने आर्त, अर्थाथी, जिज्ञासू ज्ञानी हे चार भक्तांचे प्रकार आहे. पण यतार्थ ज्ञान संपादन करुन जे जे आपणासी ठावे ते इतरांना शिकवावे, ते वाटावे तेव्हाच त्या ज्ञानावर अहंकाराचा शेवाळ चढणार नाही असे प्रतिपादन हभप विनोद महाराज खोंड यांनी केले. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश विसरोनी हा संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग त्यांनी निरुपणासाठी घेतला.
साध्वी अंबिका मातेचा सन्मान सुलोचना देवी ईश्वरी राय व शिलादेवी गोविंद यादव यांनी केला तथा संवादीनी वादक देविदास पाटमासे व तबला वादक सौरभ देवधर व किर्तनकार हभप विनोद महाराज खोंड नागपूर (उमरेड) यांचा सत्कार सुभाष यादव यांनी केला. उत्तरार्धात गुरु शिष्यांची महती विषद करताना समर्थ रामदास स्वामी व त्यांचे शिष्य अज्ञान यांचा कथाभाग कथन केला. खरा गुरु तोच असतो जो शिष्याला आपणा सारीखे करिती तात्काळ नाही काळवेळ तथा लागी अशा आपल्या शिष्याला परमपदाची प्राप्ती करुन देणारे समर्थ व त्यांचा शिष्य अज्ञान हा कथाभाग श्रोत्यांना मनस्वी भावला. आरतीचे यजमानपद ईश्वर राय वासुदेवराव बाविस्कर, गोविंद यादव, नंदकुमार बदनोरे यांनी भुषविले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.