आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष संवर्धन व संगोपन:शिक्षणाधिकारी सूर्यवंशी यांचे प्रतिपादन ; सामाजिक कार्यासाठी नफा खर्ची घालणार

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिजाऊ बँकेच्या वतीने ढाणकी शहरात वाहतुकीच्या सोयीसाठी पाच बॅरिकेड्स पाच ट्रिगार्ड ढाणकी दूरक्षेत्र कार्यालयाच्या समोरील मैदानात वृक्ष संवर्धन व संगोपन करणेसाठी बिटरगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रताप भोस यांना अनंत चतुर्थी पूर्वसंध्येवर भेट दिली. जिजाऊ बँकेला निव्वळ झालेला नफ्यातील काही भाग सामाजिक कार्यासाठी खर्ची घालण्याचा शिरस्ता सुरुवातीपासूनच बँकेचे संचालक मंडळ चालवीत असते. त्याचाच भाग म्हणून वाढते रस्ते अपघात, वाहतुकीची कोंडी ह्या नित्याच्याच भेडसावणाऱ्या समस्या डोळ्यापुढे ठेवून गणेश विसर्जनाच्या मुहूर्तावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी. बँकेच्या वतीने पाच बॅरिकेड्स व पाच ट्री गार्ड भेट देऊन. सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, बँकेचे सीईओ बीचेवार, संचालक खाजा कुरेशी, बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, करंजी सोसायटीचे अध्यक्ष माधवराव पाटील कलाने, प्रभाकर रावते, योगेश पाटील व बँकेचे कर्मचारी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...