आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दानशूरामार्फत शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसांना पेरणीकरिता बियाण्यांची मदत; तहसील प्रशासनाच्या वतीने केले बांधावर बियाणे वाटप

दिग्रस13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रणित मोरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना बी - बियाणे देण्यासाठी तहसिल प्रशासनाची भेट घेतली व बियाणे बॅग तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावरून तहसीलदार प्रवीण धानोरकर , नायब तहसीलदार सुधाकर राठोड, तलाठी प्रणिश दुधे व सहकाऱ्यांनी तालुक्यातील मागील ४ वर्षातील ६७ आत्महत्याग्रस्त वारसांच्या शेतातील बांधावर जाऊन बियाणे वाटप करण्यात आले.

शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रणित मोरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी वारसांना बी बियाणे देऊन त्यांना एक आधार देण्याचा संकल्प केला. त्यांच्या या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत व्हावी या उदात्त हेतूने हा सामाजिक अभिनव उपक्रम तहसिल प्रशासनाच्या वतीने राबवल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता दाखवल्याने या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. महसूल प्रशासनाने या उपक्रमात सहभाग नोंदवून आत्महत्या ग्रस्त शेतकरी वारसांना मदत केल्याने महसूल प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते प्रणित मोरे यांच्या कार्याचे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयांकडून अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...