आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य‎ सेवा:आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव तत्काळ‎ निकाली काढू : सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य कर्मचाऱ्यांना लागू असलेली‎ आश्वासित प्रगती योजनेसह इतरही‎ मुद्यांचे त्वरीत निराकरण करण्याची‎ ग्वाही सोमवार, दि. १० एप्रिल रोजी‎ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.‎ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.‎ सीईओंसोबत पार पडलेल्या‎ बैठकीत राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी‎ संघटनेसह जिल्हा परिषद आरोग्य‎ सेवा युनियनचे पदाधिकारी आणि‎ जिल्हा आरोग्य अधिकारी, कर्मचारी‎ उपस्थित होते. यात प्रामुख्याने १०,‎ २०, ३० चे आश्वासित प्रगती योजना‎ प्रस्ताव त्वरित निकाली काढणे,‎ आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार नियमित‎ करणे, बक्षी समितीने खंड दोन मध्ये‎ एस-९ नुसार सुधारित वेतन श्रेणी‎ मंजूर केली. त्या नुसार आरोग्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कर्मचाऱ्यांचे वेतन करावे, पदोन्नतीचे‎ प्रकरण त्वरित निकाली काढावे ,‎ सेवा पुस्तके अद्यावत करून नियमित‎ वेतन स्लिप द्यावी आदी मागणी‎ निवेदनातून करण्यात आली.‎

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी‎ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य‎ अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी‎ चर्चेतील संपूर्ण प्रश्न त्वरित निकाली‎ काढण्याची ग्वाही दिली. यावेळी‎ चर्चेकरिता जिल्हा आरोग्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधिकारी कार्यालयातील प्रशासन‎ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह राष्ट्रसेवा‎ आरोग्य कर्मचारी संघटनेचे‎ जिल्हाध्यक्ष जय तिजारे, उपाध्यक्ष‎ रमेश देशमुख, अमित कुलकर्णी,‎ युवराज जाधव यांच्यासह राज्य‎ जिल्हा परिषद आरोग्य सेवा‎ युनियनचे अध्यक्ष सुनील तलमले,‎ विजय बुटके, आशिष मडावी, पुनम‎ खामनकर, पुनम वाघमारे आदी जण‎ उपस्थित होते.‎