आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहान भागणार:अखेर गोधनीवासींची तहान भागणार; तीन ठिकाणी होणार बोअरवेलचे काम

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातलगत असलेल्या गोधनी ग्रामपंचायत अंतर्गत साईबाबानगर, श्रमिक नगर, वॉर्ड क्र.३ येथे मागील अनेक दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली होती. परिणामी, उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब सरपंच प्रणिता डंभारे यांनी लक्षात घेत तिन्ही ठिकाणी बोअरवेल खोदण्याबाबत पाठपुरावा केला. अखेर १५ वित्त आयोग निधीतून बोअरवेलचा प्रश्न मार्गी लावत तिन्ही ठिकाणी बोअरवेल करण्यात आली. तीन्ही ठिकाणी मुबलक पाणीसाठा असल्याने गोधनीवासींयाची तहान भागणार आहे. गावकऱ्यांत त्यांच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त केल्या जात आहे.

गोधणी ग्रामपंचायत अंतर्गत १५ वित्त आयोगातून गोधणी वॉर्ड क्र. १, साईबाबा नगर वॉर्ड क्रं २, श्रमिक नगर वॉर्ड क्रमांक ३, येथे उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई भासत असायची परंतू ग्रामपंचायत सरपंच प्रणिता राजेश डंभारे यांनी पुढाकार घेऊन समान धोरण अवलंबून तीनही वॉर्डमध्ये बोअरवेल मशीन लाऊन बोर केल्या आणि तीनही वॉर्ड मध्ये भरपूर प्रमाणात पाणी लागले त्यामुळे गोधनी येथील नागरिकांनी सरपंचाचे कौतुक केले आहे. या कामासाठी ग्रामपंचायतीचे सहकारी यांचे योगदान लाभले ग्रामसेवक राजेंद्र खरतडे, माजी सरपंच सुभाष तोडसाम, उपसरपंच अजाबराव मारेकर, ग्रामपंचयत सदस्य रंजना देवतळे, सिंधूबाई रमगडे, शंकर भिसे, वर्षा खोब्रागडे, सविता चांदेकर, शांता पेंदोर या सर्वाँचे मार्गदर्शक मिट्टू तिवारी, तसेच माजी उपसरपंच रजू डंभारे, रत्नसागार देवतळे. धनजंय रहाटे, नारायण रामगडे, जितुभाऊ नवदुर्गे, लक्ष्मण भुजाडे, तुळशीराम कडूकार, करणं गुजर, किशन अजमिरे, नामदेव चहाकर, मंगेश नौकरकर, सुरेश पांडे, अजय सुरोशे, वंदना राऊत, अनिल चतुरकर, विशाल सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...