आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये रविवारी विद्यार्थी हितकारीणी मित्रमंडळ आणि हरिहर कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सुभाष पवने, श्रीकांत माने, एस. मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेची पुर्वतयारी व्हावी, या उद्देशाने दरवर्षी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पूर्वतयारी परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही परिक्षा नवोदय विद्यालय परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाते. जिल्हा परिषद, नगर परिषद येथील तज्ज्ञ शिक्षक मंडळींच्या मार्गदर्शनात पेपर सीट काढून खेळीमेळीच्या वातावरणात परिक्षा घेतली जाते. यामुळे विद्यार्थी दडपणाखाली न राहता पेपर सोडवतात. याचा फायदा येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरता होत असल्याची माहिती आयोजक अंकुश सुरवसे यांनी दिली.
यशस्वितेसाठी गजानन निचळ, गजानन होलगरे, संतोष राठोड, विष्णू गावंडे, संतोष इंगळे, दिपक जायभाये, मंगेश गिरी, वैजनाथ दहिफळे, राम पांढरे, श्रीकांत इंगोले, बालाजी मोटे, अनिल जाधव, भास्कर नागरगोजे, अमोल घळे, अमर शिंदे, चंद्रमणी इंगोले, हरिहर राऊत, नीलेश म्हतारमारे, रवी ठाकरे, मुकेश म्हतारमारे, स्नेहदिप गोरे, युवराज अव्हाळे, जितेश जगताप नीलेश मोरे, माधव करडखेले, महादेव सोनटक्के, अनिल खाडे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.