आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी:सीईओंच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी, दोन कार्यकारी अभियंत्यांना नोटिस बजावली ; प्रशासकीय त्वरित मान्यता देण्याचे निर्देश

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बुधवार, दि. एक जून रोजी सेसच्या निधीचा खर्चाबाबतची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकी बाबत मुख्य लेकाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्र काढले होते. तरी बांधकाम, सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंते बैठकीला गैरहजर होते. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी उशिराने पोहचले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कार्यकारी अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात आला. तेव्हापासून प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ कामकाज पाहत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे बजेट सुद्धा प्रशासकाने सादर केले होते. त्यावेळी सामान्य प्रशासन, शिक्षण, कृषी, समाजकल्याण आदी विभागाला कोट्यवधी रूपये मंजूर केले होते. तरी ह्यातील बहुतांश कामांचे नियोजन करण्यात आले, परंतू अद्याप पर्यंत तांत्रीक, प्रशासकीय मान्यता घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे निधी अखर्चीत राहण्याची भिती मोठ्या प्रमाणात आहे. हा प्रकार होवू नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृ़ष्ण पांचाळ वेळोवेळी माहिती घेतात. तरी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळतच नाही. शेवटी संपूर्ण अधिकाऱ्यांची बैठक घेण्याबाबतचे निर्देश मुख्यलेखाधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी मुख्य लेखाधिकाऱ्यांनी बैठकीबाबतचे पत्र काढून अधिकाऱ्यांना रितसर पाठविले होते. बुधवार, दि. एक जून रोजी सकाळी त्यांच्या कक्षात बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एक, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप कुटे, सिंचनचे कार्यकारी अभियंता दमाये, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी हजर झालेच नाही. बैठकीची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी उशिराने हजर झाले, परंतू दोन्ही अधिकारी गैरहजरच होते. या प्रकारामुळे संतापलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कार्यकारी अभियंत्यांना शोकॉज बजावण्याचे निर्देश दिले.

आता अधिकाऱ्यांसाठी थम्ब अनिवार्य जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी थंम्ब मशीन बसविण्यात आली आहे. तरी काही मशीन बंदावस्थेत आहेत. बंद पडलेल्या मशीन पुन्हा चालू कराव्या, असे निर्देश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण विभाग प्रमुखांना सुद्धा थम्ब करणे अनिवार्य केले जाणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशूसंवर्धन आदी विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येते. ह्या योजनांची अंमलबजावणी डीबीटीच्या माध्यमातून होते. ही योजना प्रभावीपणे राबवण्याकरिता आयसीआयसीआयच्या सॉफ्टवेअरची चाचपणी केल्या जात आहे. यातून सर्व विभागाच्या योजना राबवण्यात येणार आहे.

चार अधिकाऱ्यांचे कक्ष सुसज्ज होणार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, पंचायत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे सुसज्ज असे कक्ष बनवण्यात येणार आहे. बजेटमध्ये तरतुद करण्यात आली होती. याबाबतची प्रशासकीय मान्यता त्वरीत घ्यावी, असे निर्देश दिले आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात त्यांना सभापतींचे कक्ष उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...