आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मित्राच्या मोबाइलवर पाठवून उत्तरे मागवणारा कॉपी बहाद्दर एका शिक्षकाला आढळून आला. ही खळबळजनक घटना शहरातील वाधवानी महाविद्यालयात गुरूवार, दि. १५ डिसेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी शिक्षकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रेमदास वय २२ वर्ष असे कॉपी बहाद्दराचे नाव असून अजय वय २१ वर्ष असे त्याच्या मित्राचे नाव आहे.
चंद्रशेखर मिर्झापूरे रा. वाघापूर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, कळंब येथील गोविंदराव शारिरीक शिक्षण महाविद्यालयात मिर्झापूरे हे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. अमरावती विद्यापिठाची परिक्षा असल्याने यवतमाळातील वाधावानी महाविद्यालयातील प्राचार्य चतूर यांनी मिर्झापूरे यांना कळंब येथून बोलावले होते. गुरूवारी सकाळी ९ वाजता पेपरला सुरूवात झाली असून वाधवानी कॉलेजमधील रूम क्रमांक पाचमध्ये पर्यवेक्षक म्हणून मिर्झापूरे यांनी नियुक्ती करण्यात आली. यावेळी बी कॉम भाग दोनचा फ्युचर सेमिस्टरचा पेपर देत असलेल्या विद्यार्थी प्रेमदास यांच्याजवळ मोबाईल आढळून आला.
ही बाब को ऑफिसर राहुल जोंधळे यांना पर्यवेक्षक मिर्झापूरे यांनी कळवून विद्यार्थीकडून मोबाईल आणि पेपर घेवून घेतला. दरम्यान मोबाइलची तपासणी केली असता, प्रेमदास याने मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर बसलेला मित्र अजय याच्या मोबाइलवर पाठवल्याचे निदर्शनास आले. त्याच्या मित्राने प्रश्नाची उत्तरे पाठवल्याचे दिसून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.