आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटकावले कांस्य पदक:अथर्व हतिमारेने पटकावले कांस्य पदक; अंतिम स्पर्धेत राजस्थानवर उत्कृष्ट शुटींग करत गोल करून विजय प्राप्त

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद येथे २६ व २७ मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय रोलबॉल जिल्ह्यातील दोन खेळाडू स्पर्धेत चमकले. वाघापूर येथील पाचवीच्या वर्गातील स्वराज संजय कोल्हे या विद्यार्थ्याने महाराष्ट्राच्या संघात अंतिम स्पर्धेत राजस्थानवर उत्कृष्ट शुटींग करत गोल करून विजय प्राप्त केला.

अर्थव मनोज हतिमारे याने आरएसएस अकॅडमीकडून शूटिंगचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन संघाला कांस्यपदक प्राप्त केले. त्यांनी यशाचे श्रेय आई, वडील, प्रशिक्षक संजय कोल्हे, जय मिरकुटे, अमितेश बोदडे, सुमित किर्दक, पंकज शेलोटकर, रोशना घुरडे यांना दिले. त्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपडे, किशोर चौधरी, नरेंद्र सिंग चौव्हाण, उपप्राचार्य रिना काळे, कृणाल वाघमारे, सुपरवायझर मिना धमानी, संतोष ढवळे, वाघापुरवासियांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...