आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉकी इंडियाच्या गाइडलाइननुसार हॉकी इंडिया दिल्ली व हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्या विद्यमाने आयोजित होणाऱ्या सर्व सबज्युनियर मुले-मुली, ज्युनिअर मुले-मुली, सिनियर मुले यांच्या स्पर्धेत खेळाडू नोंदणी करणे अनिवार्य आहे. हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळला संलग्न अथवा खेळाडू नोंदणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. नोंदणी असल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला मान्यता प्राप्त हॉकी स्पर्धेत भाग घेता येणार नाही. सिनियर गटात मुले-मुली वरिष्ठ गट जिल्हास्तरीय प्रेसिडेंट कप लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व डिपार्टमेंट, क्लब, शाळा, कॉलेज यांनी आपल्या टीमचा प्रवेश निश्चित करावा. निवड चाचणीसाठी सुद्धा नोंदणी असल्याशिवाय भाग घेता येणार नाही.
हॉकी इंडियाच्या गाइडलाइननुसार सर्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. इतर स्पर्धेत कोणतेही खेळाडू पंच सहभागी झाल्यास हॉकी महाराष्ट्राच्या आदेशानुसार कार्यवाही करून बंदी घालण्यात येईल. हॉकी इंडिया दिल्ली संलग्न हॉकी महाराष्ट्र पुणे ही एकमेव मान्यता प्राप्त संघटना महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ ही सुद्धा एकमेव मान्यता प्राप्त संघटना असून, दुसरी कोणतीही संघटना अस्तित्वात नाही. याची खेळाडू प्रशिक्षक व पंच यांनी नोंद घ्यावी, असे हॉकी इंडियाची युनिट सदस्य, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनीषा आखरे तसेच सचिव महाराष्ट्र संलग्न हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ यांनी कळवले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.