आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात उपचार सुरू:सायखेड येथील युवकावर‎ धारदार शस्त्राने हल्ला‎

दारव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका ३७ वर्षीय युवकावर‎ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार‎ शस्त्राने वार करीत जिवे मारण्याचा‎ प्रयत्न केला. ही घटना बुधवार, दि.‎ १ मार्चला सकाळी दारव्हा‎ तालुक्यातील सायखेड येथे‎ उघडकीस आली.‎ जीवन रामदास तुळजापुरे वय ३७‎ वर्ष असे गंभीर जखमी युवकाचे‎ नाव असून त्याच्यावर जिल्हा‎ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू‎ आहे. पोलिस सुत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनूसार, दारव्हा‎ तालुक्यातील सायखेड येथील दोन‎ युवकांना बुधवारी सकाळच्या‎ सुमारास गावातील उत्तमराव बागल‎ यांच्या शेताजवळ जीवन तुळजापूर‎ हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध‎ अवस्थेत पडून असल्याचे‎ निदर्शनास आले. याबाबतची‎ माहिती जीवन याच्या कुटुंबीयांसह‎ गावातील नागरिकांना देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...