आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अट्टल दुचाकी चोरटे‎ एलसीबीच्या जाळ्यात‎

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अट्टल दुचाकी चोरट्या तिघांना एलसीबीचा पथकाने‎ ताब्यात घेवून त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या‎ आहे. ही कारवाई शुक्रवार, दि. ३ मार्चला‎ सायंकाळच्या सुमारास करण्यात आली असून‎ विकास उर्फ विक्की पवार वय २६ वर्ष रा. विदर्भ‎ हाउसिंग सोसायटी, सुरज लडके वय २२ वर्ष रा.‎ बरबडा आणि आकाश निमकर वय २८ वर्ष रा.‎ जामनकर नगर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या‎ तिघांची नावे आहे.‎

शहरातील राणा प्रताप गेट परिसरातून दि. २८‎ फेब्रुवारीला एक दुचाकी चोरट्यांनी लंपास केली‎ होती. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा‎ नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील‎ चोरट्यांच्या शोध एलसीबीचा पथकासह‎ अवधुतवाडी पोलिस घेत होते. अश्यात शुक्रवारी‎ गोपनीय माहितीच्या आधारावर तिन संशयीतांना‎ एलसीबीचा पथकाने ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू‎ केली. यावेळी त्या तिघांनी राणा प्रताप गेट परिसरातून‎ तीन दुचाकी लंपास केल्याची कबूली दिली. दरम्यान‎ त्यांनी अवधुतवाडी ठाण्याच्या हद्दीतील इतर चार‎ दुचाकी देखील लंपास केल्याची कबूली दिली.‎

बातम्या आणखी आहेत...