आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न:महिलेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न

घाटंजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील घाटी येथील सुभाष वार्डात ३ डिसेंबरला रात्री १० वा. घडली. या प्रकरणी जखमी महिलेच्या आईने घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संदीप चौरागडे (४५) रा. सुभाष वार्ड घाटी असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटंजी तालुक्यातील घाटी येथील संदीप चौरागडे हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून वाद करीत होता. शनिवारी संदीप चौरागडे पत्नीसोबत पुन्हा वाद केला. त्यानंतर पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून माचिसची काडी लावून पेटून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह कुटूंबीयांनी धाव घेवून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विलास सिडाम, शशिकांत नागरगोजे, राहुल खंडागळे, विशाल वाढई करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...