आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचा सोमवारी पोलिस मुख्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सायबर गुन्ह्यांची माहिती आणि चौकशीच्या टिप्स पोलिस दिल्या.
संगणकीय क्षेत्रात सायबर क्राइमचा झालेला शिरकाव हा अनुचित प्रकार आणि संकटांना आमंत्रण देणारा ठरत आहे. नागरिकांना सायबर क्राइममुळे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सहन करण्याची वेळ येत आहे. मोबाईल वापरणाऱ्या अनेकांना सायबर क्राइमला तोंड द्यावे लागत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्याकरता पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सायबरशी तज्ज्ञांनी सायबर गुन्ह्यांची माहिती दिली.
प्रत्येक ठाण्यात ‘सायबर रिसोर्स पर्सन’: सायबर विषयक घडणारे गुन्हे रोखण्यासाठी सोमवारपासून तीन दिवसाचे प्रशिक्षण पोलिस मुख्यालयात दिले जात आहे. त्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यात एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्याला ‘सायबर रिसोर्स पर्सन’ असे नाव दिले जाणार आहे. यापूर्वी सायबर विषयक घटना घडली, तर यवतमाळ सायबर विभागाकडे जावे लागत होते. आता मात्र, प्रत्येक पोलिस ठाण्यातच एक कर्मचारी देण्यात येणार असल्याने यवतमाळ सायबर सेलचा ताण कमी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.