आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव आलिशान कारने उभ्या अॅटोलामागच्या दिशेनेयेवून जबर धडकदिली असून या धडकेत अॅटोत बसून असलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार, दि. ३ एप्रिलला पहाटे ३.२५ वाजताच्या सुमारास शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर घडली. जय सुनील काठोडे वय २३ वर्ष रा. रोहीनी सोसायटी जांबरोड, यवतमाळ असे मृत ऑटो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील जांबरोड परिसरातील रोहीनी सोसायटीत जय काठोडे कुटूंबीयासंह राहत असून ऑटो चालक म्हणून काम करीत होता. रविवारी रात्री जय हा बसस्थानक परिसरात ऑटो घेवून भाड्याची वाट बघत होता. यावेळी जय याचा चुलत भाऊ रवी मडावी त्या ठिकाणी आला.
दरम्यान जय हा रवीला म्हणाला की, इथून भाडे मिळणार नाही, बसस्थानक सिग्नलवर ट्राव्हल्स येण्याची वेळ झाली, तिथून भाडे मिळेल म्हणून रवीला घेवून बसस्थानक सिग्नलकडे निघाला. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदसमोर रवी याने जयला ऑटो थांबविण्यास सांगितले आणि रवी लघुशंकेसाठी खाली उतरला. यावेळी नविन बसस्थानककडून आलिशान कार एमजी हेक्टर क्रमांक एमएच-२९-बीपी-०९९९ भरधाव येतांना रवीला दिसली. त्यामूळे रवी याने जोरजोरात आवाज देत जयला अॅटोतून बाहेर निघण्यास सांगण्याचा प्रयत्न केला.
संतप्त नागरिकांनी पेटवली कार भरधाव आलिशान कार एमजी हेक्टरने अॅटोला धडक दिल्यानंतर पळ काढला होता. तर दुसरीकडे अपघातात ऑटो चालका जय याचा मृत्यू झाला होता. यावेळी नागरिकांनी त्या आलीशाल कारचा शोध घेतला. ती कार दत्त चौक भाजी मार्केट परिसरात नागरिकांनी सकाळच्या सुमारास आढळून आली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ती कार चक्क पेटविली. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी नगरपालिका अग्निशमल दलाला पाचारण केले. अग्निशमन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत कार जळून खाक झाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.