आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रांतिज्योती सावित्रीच्या लेकी महिला आधार फाउंडेशन, मंगरूळ चव्हाळा यांच्या वतीने महिला सक्षमीकरण व आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम नुकताच पार पडला. मुख्य मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या पूर्ती लाखोडे यांनी महिलांसमोरील सध्याच्या वातावरणातील आव्हाने व त्याला सामोरे कसे जावे यासह त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने आरोग्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. वैशाली पाटणकर यांनी आपल्या कारकीर्दीतील अनुभव व स्त्री सक्षमीकरणासाठी स्त्री-पुरुषांची कर्तव्ये याबाबत माहिती दिली. स्त्रियांमध्ये नवनिर्मितीचा ध्यास असून तिने ठरवले तर शिवबांसारखा लोककल्याणकारी चारित्र्यसंपन्न राजा जगाला देऊ शकते आणि ज्या काळात स्त्री शिक्षण पाप मानले जायचे, त्या काळी प्रवाहाविरुद्ध जाऊन जाेतिबांच्या साथीने सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे क्रांतिकारी कार्य केले. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणून समाज विकासासाठी पोषक वातावरण निर्माण केले.
अशा दोन महान स्त्रिया सावित्रीबाई, जिजामाता व असंख्य वीरांगना आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहतात. म्हणून क्रांतिज्योती सावित्रीच्या लेकी महिला आधार फाउंडेशनच्या वतीने महिलांना वाणासोबतच वैचारिक ठेवा दिला. कार्यक्रमाचे मुख्य व्यवस्थापक गणेश अवझाडे तसेच मनोज गावनेर यांनी सर्व माता भगिनींच्या शक्तीला जागृत करण्यासाठी सावित्री, जिजाऊंच्या विचारांना साद घातली.
सतीश शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात स्त्रियांनी सक्रिय राहण्यासाठी उत्तेजित केले. फाउंडेशनच्या अध्यक्ष नम्रता तांबटकर यांनी फाउंडेशनचे कार्य व ध्येय सांगितले. अंजली इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर गौरी वारकर व रितू राऊत यांनी स्वागत गीत म्हटले. या वेळी लता कातोरे, लिला चवाळे, पायल गावनेर, सुशीला कुकडे, रूपाली अवझाडे, अंबिका तळोकार, सुनीता वारकर, रंजना गावनेर, पुष्पा अवझाडे, रिंकू शिंदे, रेखा बिसने, वनिता गुल्हाने यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.