आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धानोरा ते इसापूरपर्यंत निघाली पदयात्रा:काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी विधानसभा उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात दिग्रस, दारव्हा, नेर या तिन्ही तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने दि. ९ ते १४ ऑगस्ट पर्यंत काँग्रेस तर्फे भव्य पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दारव्हा तालुक्याच्या पदयात्रेची सांगता महागाव कसबा, नेरची बानगाव तर दिग्रसची इसापूर येथे समारोप करण्यात आला.

धानोरा खु. येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन ढोल ताश्यांच्या गजरात आझादी गौरव पदयात्रा मोठ्या उल्हासात इसापूर पर्यंत काढण्यात आली. पदयात्रे दरम्यान येणाऱ्या मुख्य मार्गावरील तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी इसापूर येथे सांगता दरम्यान माणिकराव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने शहिदांच्या नावाचा उल्लेख करीत स्वातंत्र्य कसे मिळाले याबाबत आपले विचार व्यक्त केले. यावेळी माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे, शंकर जाधव, सलीम पटेल, राजेंद्रसिंह चौहान, अॅड. सुधाकर जाधव, विजय घाटे, दिनेश सुकोडे, सोहेल, राहुल वानखडे, नंदराज ठाकरे, मुनेश्वर, रज्जाक, कामील, मोहम्मद, कादर, चंद्रकांत पवार, स्वाती जमदडे, सुलोचना कांबळे, साबीर, युवराज कांबळे, मुरलीधर कांबळे, सुभाष जिजोरे, गुघाणे, देशमुख, ढोले, रमेश पाटील, मिया खा, फैसल पटेल, जमीर, मलनस, सादिक, शिकारे, संजय महल्ले सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...